६ . उबग
तुझ्या अशा वागण्याचा
उबग आता आलाय मला
तू कधी सुधारशील असं
अजिबात वाटत नाही मला
तुझ्या अशा छळण्याचा
त्रास खूप होतो मला
तुझं ह्रदयशून्य वागणं
सहन होत नाही मला
आपल्या एकत्र असण्याला
अर्थ वाटत नाही मला
तुला सोडून जाण्याचाच
मार्ग फक्त दिसतो मला
कधीच येणार नाही परतून
बोलावलेस तरी मला
आयुष्यात पुन्हा तुझं
तोंडही पहायचं नाहीय मला